महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

ग्रामीण भागाच्या विकासासाठी तंत्रज्ञान विकसीत करा, मोदींचे वैज्ञानिकांना आवाहन - Narendra Modi at Science Congress

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानातील प्रगती गरजेची असल्याचे म्हणत त्यांनी कृषी, आरोग्य, दळणवळण, सरकारी योजना, संपर्क व्यवस्था, पर्यावरण, उद्योग सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास महत्त्वाचा असल्याचे मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी

By

Published : Jan 3, 2020, 12:14 PM IST

Updated : Jan 3, 2020, 12:30 PM IST

बंगळुरू - विज्ञान क्षेत्रामध्ये महत्त्वाचे व्यासपीठ असणाऱ्या इंडियन सायन्स काँग्रेसचे १०७ वे अधिवेशन आज (शुक्रवारी) बंगळुरू येथे सुरू झाले आहे. ग्रामीण विकासात विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास ही या वर्षीच्या सायन्स काँग्रेसची संकल्पना आहे. यावेळी अधिवेशनाला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. नव्या वर्षातील पहिला कार्यक्रम विज्ञानाशी जोडला गेल्यामुळे मोदींनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनी 'इंडियन सायन्स' काँग्रेस अधिवेशनाला संबोधित केले
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानातील प्रगती गरजेची असल्याचे म्हणत त्यांनी, कृषी, आरोग्य, दळणवळण, सरकारी योजना, संपर्क व्यवस्था, पर्यावरण, उद्योग सर्व क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास महत्त्वाचा असल्याचे मोदी म्हणाले. विज्ञान क्षेत्रातील प्रकाशनामध्ये भारत जगामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर नव्या अविष्कारामध्ये भारत ५२ व्या स्थानावर आहे. भारताचे यश विज्ञानाच्या प्रगतीवर अवलंबून आहे. तंत्रज्ञानामुळे देशाचा विकास होत आहे. वैज्ञानिकांनी लावलेले शोध लोकांपर्यंत पोहचले पाहिजेत. नव्या भारताकडे वैज्ञानिक दृष्टीकोन हवा, तोच देशाला दिशा देईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

हेही वाचा -१०७ व्या 'इंडियन सायन्स काँग्रेस'चे अधिवेशन बंगळुरुत सुरु; देश-विदेशातील वैज्ञानिकांची मांदियाळी


संपर्क क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या शोधाने मोबाईलची सेवा सर्वसामान्यांना खुली झाली. नागरिक एकमेकांना जोडले गेले. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागाशी संबधीत तंत्रज्ञान विकासावर संशोधकांनी भर देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्वच्छ भारत अभियानाचं जगभरात कौतुक होत आहे, हे फक्त तंत्रज्ञानामुळे शक्य झाले. 'गुड गव्हर्नन्स'साठी तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. ग्रामीण भागात शौचालय, वीज पोहचणे तंत्रज्ञानामुळे शक्य झाले.

६ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचे पैसे एकाचेवेळी देण्याचा विक्रम काल तूमकुर येथे केला. हे आधार कार्डमुळे शक्य झाले. तंत्रज्ञानामुळे गरीब लाभार्थी शोधणे सोपे झाले. गावागावांतील रस्ते वेळेवर पूर्ण होत आहे. गरीबांसाठी २ कोटी घरांची निर्मिती तंत्रज्ञानामुळे शक्य झाली. लाभार्थी आणि योजनेमधले अंतर तंत्रज्ञानामुळे संपले. शेतकरी आता मध्यस्थीविना शेतातील माल विकू शकतो. शेतकऱ्यांना हवामान आणि शेतीसंबंधी सुविधा मिळणे तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे.

हेही वाचा -अयोध्या प्रकरणी गृह मंत्रालयाचा पुन्हा एक मोठा निर्णय...


ग्रामीण भागात तंत्रज्ञान अधिक व्यापक होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात पाणी पोहचवण्यासाठी 'जलजीवन मिशन' सुरू करण्यात आले आहे. 'वॉटर गव्हर्नन्स' क्षेत्रात तंज्ञनान विकास होण्याची गरज आहे. सॉईल कार्ड (माती परिक्षण माहिती) चा शेतीत कसा उपयोग होईल हे पहायला हवे. शेतमाल वितरण व्यवस्थेतही तंत्रज्ञानही महत्त्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.

'सिंगल युझ प्लास्टिक' मुक्तीचा संकल्प पर्यावरणाच्या रक्षणासाठी करण्यात आला आहे. प्लास्टिकला पर्याय शोधण्याचे आवाहन मोदींनी वैज्ञानिकांना केले. वैज्ञानिकांनी शोधलेल्या तंत्रज्ञानावर छोटेमोठे उद्योग उभे राहिले. बायोइंधन क्षेत्रात संधी आहेत, या क्षेत्रात नव्या उद्योजकांनी उतरावे, असे आवाहन मोदींनी केले. विविध क्षेत्रातील कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्याचे आवाहन मोदींनी केले. नव्या दशकात भारताचा नवा दृष्टीकोन असेल, असे मोदी म्हणाले.

Last Updated : Jan 3, 2020, 12:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details