बियारित्झ - पंतप्रधान मोदींना काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा विश्वास आहे. काश्मीरप्रश्नी ते पाकिस्तानशी चर्चाही करतील, आणि मला खात्री आहे की, ते हा मुद्दा चांगल्या प्रकारे हाताळतील", असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्समधील जी-७ परिषदेवेळी व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची या परिषदेत आज बऱ्याच महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी काश्मीरच्या मुद्यावर प्रामुख्यांने चर्चा केली.
पंतप्रधान मोदी काश्मीरचा प्रश्न चांगल्या प्रकारे हाताळतील, डोनाल्ड ट्रम्प यांना विश्वास - जी-७ परिषद
फ्रान्समधील जी-७ परिषदेत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज बऱ्याच महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली.
Modi and Trump about Kashmir issue
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत आणि पाकिस्तानमधील सर्व प्रश्न हे द्विपक्षीय आहेत, त्यामुळे या प्रश्नांबद्दल आम्हाला इतर कोणत्या देशाला त्रास द्यायचा नाही.
नुकतेच जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यात आले. यानंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मागील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावेळी काश्मीर प्रश्नावर मध्यस्ती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते.
Last Updated : Aug 26, 2019, 6:07 PM IST