नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज (शुक्रवार) प्रथम पुण्यतिथी आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी वाजपेयींना 'सदैव अटल' या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली. आदारंजली वाहण्यासाठी भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमामात जमले होते.
सदैव अटल : भारतरत्न वाजपेयींना आदरांजली वाहण्यासाठी स्मृतिस्थळावर रीघ - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी वाजपेयींना 'सदैव अटल' या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली.
अटल बिहारी वाजपेयी यांची कन्या नमिता कौल भट्टाचार्य आणि नात निहारिका याही स्मृतिस्थळी आदरांजली वाहण्यासाठी आल्या होत्या. गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय कार्यकारीणी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही सदैव अटल स्मृतिस्थळी वाजपेयींना आदरांजली वाहिली.
१६ ऑगस्ट २०१८ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे दिल्लीतील एम्स रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले होते. वाजपेयी यांनी ३ वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषविले आहे. वाजपेयी यांचा जयंती दिन २५ डिसेंबर हा दिवस 'गुड गव्हर्नन्स डे' म्हणून साजरा केला जातो. २०१४ साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते.