नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदींनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आज त्यांनी ओडिशाच्या कोरापूट येथे जनसभेला संबोधित केले. दरम्यान, अपल्या सरकारच्या यशाचे खरे वारसदार देशातील जनता आहे, असे ते यावेळी म्हणाले. तर, आता भारत अंतराळातही चौकीदारी करण्यास सक्षम झाला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
लोकसभा निवडणुकांसाठी केवळ २ आठवडे शिल्लक आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी एकीकडे सभा गाजवत आहेत आणि ५ वर्षात त्यांनी केलेल्या कार्याचा पाढा जनतेसमोर वाचत आहेत. नुकतेच भारताने मिशन शक्ती नावाखाली आकाशातील उपग्रह क्षेपणास्त्राच्या मदतीने पाडण्यात यश मिळवले आहे. त्यावरूनही पंतप्रधान मोदींनी जनतेला संबोधित केले.