महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून होते वंचित, उडुपीतील ३ मुलींनी ४७ मोबाईल भेट केले - Online Education Udupi

सुरुवातीला पॉकेट मणी आणि आई-वडिलांच्या सहकार्याने मुलींनी चेरकाडी या शाळेतील १० विद्यार्थ्यांना मोबाईल फोन दिले. त्यानंतर एका सोशल नेटवर्किंग साइटवर ग्रुप बनवून अती ग्रामीण भागातील शाळा शोधण्यात आली. त्यानंतर तिन्ही मुलींनी दानदात्यांच्या सहाय्याने शाळेला ४७ मोबाईल फोन भेट केले.

उडुपीतील ३ मुलींनी ४७ मोबाईल भेट केले
उडुपीतील ३ मुलींनी ४७ मोबाईल भेट केले

By

Published : Oct 25, 2020, 5:10 PM IST

उडुपी - जिल्ह्यातील तीन मुलींनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल फोन भेट केले आहेत. मुलांना ऑनलाइन क्लासेसला उपस्थित राहता यावे या हेतूने ही मदत करण्यात आली आहे. अवनी, केकी आणि अदिथ्री, असे मदत करणाऱ्या मुलींची नावे असून, त्या उडुपी येथील एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहेत.

ऑनलाइन क्लासेस संबंधी ग्रामीण भागात सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यात आर्थिक कारणामुळे ग्रामीण भागातील काही शाळेकरी मुले ऑलनाइन शिक्षणाला मुकत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे, अवनी व तिच्या मैत्रिणींनी अशा मुलांना मोबाईल फोन भेट केले.

सुरुवातील पॉकेट मणी आणि आई-वडिलांच्या सहकार्याने सदर मुलींनी चेरकाडी या शाळेतील १० विद्यार्थ्यांना मोबाईल फोन दिले. त्यानंतर एका सोशल नेटवर्किंग साइटवर ग्रुप बनवून अती ग्रामीण भागातील शाळा शोधण्यात आली. त्यानंतर तिन्ही मुलींनी दानदात्यांच्या सहायाने शाळेतील विद्यार्थ्यांना ४७ मोबाईल फोन भेट केले.

हेही वाचा-संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सिक्कीम दौऱ्यावर; गंगटोक-नाथुला रस्त्याचे उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details