नवी दिल्ली - देशात कोरोनाचे रुग्ण वाढले असून खेड्या-पाड्यातही कोरोनाचे संक्रमण झपाट्याने पसरले आहे. खेडेगावात कोरोना चाचण्यासाठी चांगल्या सुविधा नाहीत. मात्र, पंजाबच्या लुधियानामध्ये राज्य सरकारची कोरोना रुग्णवाहिका खेड-पाड्यात पोहचून कोरोना चाचणी घेत आहे. या चाचणीसाठी लोकांकडून शुल्क घेण्यात येत नसून मोफत चाचणी करण्यात येत आहे. सरकारच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.
'कॉल करा अन् मोफत चाचणी करून घ्या', पंजाब सरकारचा अभिनव उपक्रम - पंजाब कोरोना लेटेस्ट न्यूज
पंजाबच्या लुधियानामध्ये राज्य सरकारची कोरोना रुग्णवाहिका खेड-पाड्यात पोहचून कोरोना चाचणी घेत आहे. या चाचणीसाठी लोकांकडून शुल्क घेण्यात येत नसून मोफत चाचणी करण्यात येत आहे.
कोरोना चाचणी करण्याची इच्छा असलेले लोक आमच्याशी संपर्क साधतात. त्यावर आम्ही संबधित ठिकाणी पोहचून त्यांची चाचणी करतो, असे डॉ.दीप अरोड़ा यांनी सांगितले. दरम्यान, पंजाबमध्ये 19096 रुग्ण सक्रिय असून 2212 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
11 सप्टेंबरपर्यंत देशात 5,51,89,226 नमुने तपासणी झाली असून, 10 लाख 91 हजार 251 नमूने मागील चोवीस तासांमध्ये तपासण्यात आले आहेत. तर गेल्या चोवीस तासांत देशात करोनाबाधितांच्या संख्येत उच्चांकी 97,570 नव्या रूग्णांची नोंद झाली. तर 1,201 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.