नीचम - मध्यप्रदेशतील नीचम जिल्ह्यामध्ये जमावाने एका व्यक्तीची मोराची चोरी केल्याच्या संशयातून हत्या केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान पिडित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
मॉब लिंचिंग: मोराची चोरी केल्याच्या संशयातून एकाची हत्या; 10 जणांना अटक - Crime
मध्यप्रदेशतील नीचम जिल्ह्यामध्ये जमावाने एका व्यक्तीची मोराची चोरी केल्याच्या संशयातून हत्या केल्याची घटना घडली आहे

मोराची चोरी केल्याच्या संशयातून एकाची हत्या
कुकडेश्वर ठाण्याच्या क्षेत्रामधील लसूडीया आतरी गावामध्ये एका व्यक्तीची मोराची चोरी केल्याच्या संशयातून हत्या करण्यात आली आहे. बसने रस्त्यावर उतरवल्यानंतर आम्ही पायी घरी जात होतो. त्यावेळी आमच्यावर हल्ला झाला, असे मृत व्यक्तीच्या मुलाने म्हटले आहे.
मॉब लिंचिंगची ही या जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. यापुर्वी बकरी चोरीच्या संशयातून जमावाने तीन युवकांना मारहाण केली होती.