कोलकाता -तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती शनिवारी मुकुल रॉय यांनी दिली होती. यानंतर रविवारी दिलीप घोष यांनी देखील पश्चिम बंगाल मधील आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.
दीदींना धक्का ; पश्चिम बंगालमधील आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत - तृणमूल काँग्रेस
दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल मधील आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

दिलीप घोष
सध्या गोवा आणि कर्नाटकमध्ये राजकीय नाट्य सुरू असून पश्चिम बंगालमध्ये देखील राजकीय उलथापालथ होण्याच्या मार्गावर आहे. तृणमूल काँग्रेस, सीपीएम आणि काँग्रेस या पक्षांचे मिळून तब्बल 107 आमदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते मुकुल रॉय यांनी केला होता. यानंतर आज भाजप खासदार दिलीप घोष यांनी रॉय यांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
2016 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यात तृणमूल काँग्रेसने 294 पैकी 216 जागा जिंकल्या होत्या.