भोपाल -कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहे. देशभरात लॉक डाऊन करण्यात आला आहे. तरीही नागरिक नियमांचे उल्लंघन करून घराबाहेर पडताहेत. या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशच्या हरदा मतदारसंघाचे आमदार कमल पटेल यांनीही नागरिकांना जागरूक करण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली आहे.
'मिस्टर कोरोना'शी भाजप आमदाराने साधला संवाद; आमच्या जगातून निघून जा, केली मागणी - कोरोना जनजागृती
कोरोना विषाणूबाबत नागरिकांमध्ये जागरुकता येण्यासाठी भाजप आमदार कमल पटेल यांनी एक युक्ती केली आहे. यामध्ये ते कोरोनाबाबत माहिती देण्यासाठी 'मिस्टर कोरोना' नामक एका बाहुलीशी संवाद साधून त्याला आमच्या दुनियेतून कायमचा निघून जा, असे आवाहन करत आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढतच आहे. शासनस्तरावर विविध उपाययोजनका करूनही हे प्रमाण आटोक्यात येत नाही आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीची ठिकाणे टाळावी असे वारंवार आवाहन करण्यात येऊनही नागरिक याचे पालन करत नसल्याचे पुढे येत आहे. या पार्श्वभूमीवर हरदाचे आमदार कमल पटेल यांनीही नागरिकांना जागरूक करण्यासाठी नवीन उपाय केला आहे. त्यांनी कोरोना नामक एका बाहुल्याशी संवाद साधून त्याद्वारे नागरिकांना कशाप्रकारे सुरक्षा बाळगता येईल, याबाबत संदेश दिला आहे. यासोबतच, 'मिस्टर कोरोना' नामक बाहुल्याशी संवाद साधताना, त्याला आमच्या दुनियेतून कायमचा निघून जा, अशी मागणीही केली आहे.
या बोलत्या बाहुल्याच्या माध्यमातून एका कलाकाराने 'मिस्टर कोरोना'च्या आवाजात बातचीत केली आहे. त्यांच्या या चर्चेमध्ये नागरिकांना या संसर्गात कशी काळजी घेण्यात येईल याबाबत संदेश देण्यात आला आहे.