नवी दिल्ली - अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बॅटने मारहाण करणारे आमदार आकाश विजयवर्गीय यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीद्वारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याआधी मंगळवारी पंतप्रधान मोदींनी भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आमदार आकाश विजयवर्गीय यांच्या बॅटिंगविषयी नाराजी व्यक्त केली होती.
आमदार आकाश विजयवर्गीय यांना भाजपची नोटीस - committee
कोणाचाही मुलगा असो, शिस्तभंग चालणार नाही, असे मोदींनी आकाश यांचे नाव न घेता म्हटले होते. आता पक्षाच्या शिस्तपालन समितीद्वारे आमदार आकाश विजयवर्गीय यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे.
कोणाचाही मुलगा असो, शिस्तभंग चालणार नाही, असे मोदींनी आकाश यांचे नाव न घेता म्हटले होते. यासंबंधी 'पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांचे चिरंजीव आकाश विजयवर्गीय यांच्याबद्दल पंतप्रधान मोदी अतिशय नाराज आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारची वर्तवणूक खपवून घेतली जाणार नाही. मग तो कुणाचाही मुलगा किंवा खासदार असला तरी फरक पडणार नाही. अशी माणसे पक्षात नकोत. कोणालाही गर्व नसला पाहिजे. तसेच, योग्य वर्तवणूक ठेवली पाहिजे,' असे भाजपचे खासदार राजीव प्रताप रूडी यांनी सांगितले.