राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीयत्व यांची सरमिसळ हे राजकीय कारस्थान - शबाना आझमी - nationalism
'देशातील लोक काही चुकीचे दिसत असल्यास त्यावर आपले मत व्यक्त करतात. मात्र, त्यांचे देशावर प्रेम असते. एखादा राष्ट्रवादी अशी बाब ऐकून घ्यायला तयार नसतो. अशीच काहीशी परिस्थिती फ्रेंच राज्यक्रांतीवेळी तयार झाली होती,' असेही त्या म्हणाल्या.
डेहराडून - ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी लोकांनी 'राष्ट्रभक्ती' आणि 'राष्ट्रीयत्व' या दोन्ही संकल्पना लक्षात घेतल्या पाहिजेत, असे म्हटले आहे. तसेच, यातला फरक लक्षात घ्यायला हवा. तरच, त्यांची एकमेकांशी होणारी सरमिसळ लोकांच्या लक्षात येईल. तसेच त्यात अडकण्यापासून वाचता येईल, असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.
'सध्या देशात 'राष्ट्रभक्ती' आणि 'राष्ट्रीयत्व' यांची राजकीय स्वार्थासाठी सरमिसळ केली जात आहे. यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे. सध्या देशाशी संबंधित कोणत्याही विषयाबाबत चुकीचे असलेले दाखवून देणे म्हणजे तुम्ही राष्ट्रद्रोही आहात, असे सरसकट ठरवले जात आहे. यासाठी लोकांनी यातला फरक लक्षात घ्यायला हवा,' असे आझमी म्हणाल्या.
'देशातील लोक काही चुकीचे दिसत असल्यास त्यावर आपले मत व्यक्त करतात. मात्र, त्यांचे देशावर प्रेम असते. एखादा राष्ट्रवादी अशी बाब ऐकून घ्यायला तयार नसतो. अशीच काहीशी परिस्थिती फ्रेंच राज्यक्रांतीवेळी तयार झाली होती,' असेही त्या म्हणाल्या.
आझमी यांचे पती जावेद अख्तर यांनीही सध्याच्या राजकीय परिस्थितीविषयी मत व्यक्त केले. 'हिंदुस्थानी प्रवृत्ती कट्टरतावादी होऊच शकत नाही. आपल्या किमान ४० पिढ्यांनी पूर्वी शेती केली आहे. आजही भारत शेतीप्रधान असून ७० टक्के लोक शेती करतात. शेतकरी कधीही कट्टरतावादी असू शकत नाही ते टोकाचे कम्युनिस्ट किंवा टोकाचे हिंदुत्ववादीही होऊ शकत नाहीत,' असे जावेद अख्तर म्हणाले.