नवी दिल्ली- अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले भारताचे चांद्रयान-२ आज (सोमवार) अवकाशात झेपावले. दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-3 च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात सोडण्यात आले. 54 दिवसांनी हे यान चंद्रावर पोहचणार आहे.
UPDATES :
- चांद्रयान-२ मोहिमेवर कार्टूनिस्ट सब्बीर यांचे कार्टून प्रसिद्ध
- इस्रोचे प्रमुख के. सीवन म्हणाले, पुढील २४ तासात काम पूर्ण होणार आहे. चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. ज्यांचा या कार्यात सहभाग आहे, त्या सर्वांना माझा सलाम. इस्रोचे काम अद्यापही संपले नाही. यावर्षी इस्रो अनेक योजनांची आखणी करत आहे.
- जीएसएलव्ही एमके-३-एम-१ ने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर इस्रोचे प्रमुख के सीवन यांच्यासह शास्त्रज्ञांनी केला जल्लोष
- चांद्रयान-२ ने यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत केला प्रवेश
- दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावले.
लॉन्चिंगनंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर 14 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाईल. या दरम्यान, चांद्रयानाचा वेग अधिकाधिक १० किलोमीटर प्रति सेकंद आणि कमीत कमी ताशी ३ किलोमीटर असणार आहे.