महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

Countdown begins..टेन.. नाईन.. वन ..,काही तासातच झेपावणार भारताचे चांद्रयान-2

भारताची मिशन चांद्रयान-2 मोहीम सुरू होणार असून रविवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 ला भारतातील सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV मार्क-३च्या मदतीने सोडले जाणार आहे. लॉन्चिंगनंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर 14 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाईल.

मिशन चांद्रयान-2

By

Published : Jul 14, 2019, 3:32 PM IST

Updated : Jul 15, 2019, 2:20 AM IST

मुंबई - भारताच्या मिशन चांद्रयान-2 मोहिमेला सुरू होण्यास आता काही तासच बाकी आहेत. 14 जुलै रोजी मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३ च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात उड्डाण घेणार आहे. लॉन्चिंगनंतर 54 दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहचेल. इस्रोच्या या वाटचालीकडे केवळ भारताचेच नव्हे तर जगाचेही लक्ष लागले आहे. याबाबत नेहरू तारांगणचे माजी संचालक अरविंद परांजपे यांनी माहिती दिली.

भारताच्या मिशन चांद्रयान-2 बद्दल माहिती देताना नेहरू तारांगणचे माजी संचालक अरविंद परांजपे

रविवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 ला भारतातील सर्वात शक्तिशाली रॉकेट GSLV मार्क-३ च्या मदतीने अवकाशात सोडले जाणार आहे. लॉन्चिंगनंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर 14 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाईल. या दरम्यान चांद्रयानाचा वेग अधिकाधिक १० किलोमीटर प्रति सेकंद आणि कमीत कमी ताशी ३ किलोमीटर असणार आहे.


सन २००८ मध्ये पाठवलेल्या चांद्रयान 1 मध्ये चंद्राच्या कक्षेत फिरणारे ऑरबिट लावण्यात आले होते. पण, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करणारे रोव्हर त्यावेळी त्यात नव्हते. यावेळी मात्र या यानाचे रोव्हर चंद्रावर उतरणार आहे. आता चांद्रयान-२ मोहिमेमधले रोव्हर जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्यं उलगडता येणार आहेत. चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यावर त्याचे ऑर्बिटर, लँडरपासून वेगळे होणार, त्यानंतर लँडर 15 मिनिटात चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा होईल. ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसर्स असणार आहेत. अशाचप्रकारे रोव्हर देखील अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असेल. ऑर्बिटर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभूमीवरील खनिजे आणि इतर संबंधिची माहिती पाठवण्याचे काम करतील.


चांद्रयान 1 मध्ये आपला पहिला प्रयत्न पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडण्याचा होता. आता चंद्रायान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. पूर्ण चांद्रयान-२ च्या खर्चाचा विचार केल्यास तो हॉलिवूडच्या एका सिनेमापेक्षाही कमी आहे. आपल्याला एवढेच बघायचंय आहे की, आपण चंद्रावर व्यवस्थित उतरतो आहे की नाही. जर यशस्वी झालो तर नक्कीच यापुढे यानाबरोबर माणूस पाठवण्यासाठीचाही इस्रोचा ध्यास आहे, असेही परांजपे यांनी सांगितले.


चांद्रयान-२ विशेष


-प्रक्षेपण झाल्यानंतर काही दिवस ते पृथ्वीच्या कक्षेत फिरत राहील.
- भारताने पैशांची बचत करण्याकरता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा उपयोग केलेला आहे.
-लँडरचे नाव विक्रम ठेवले आहे. जे विक्रम साराभाई यांच्या नावावर आहे. साराभाई भारतीय अंतराळ संशोधनात जनक म्हणून गणले जातात.

Last Updated : Jul 15, 2019, 2:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details