महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

उत्तर प्रदेश : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या, दोघांना अटक - अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हत्या

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

उत्तर प्रदेश क्राईम न्यूज
उत्तर प्रदेश क्राईम न्यूज

By

Published : Aug 16, 2020, 1:17 PM IST

Updated : Aug 16, 2020, 1:59 PM IST

लखीमपूर खीरी -उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीजिल्ह्यात 13 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. शवविच्छेदनात या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचे सिद्ध झाले आहे. या दोघांवर एनएसए अंतर्गत कारवाई केली जात आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या

लखीमपूर खीरी जिल्ह्यातील ईसानगर पोलीस ठाणे क्षेत्रात शुक्रवारी रात्री उशिरा एका मुलीचा मृतदेह मिळाल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. उसाच्या शेतात हा मृतदेह सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. या मुलीच्या डोळ्याजवळ काही जखमेच्या खुणाही होत्या. यातून रक्त निघाले होते. तिच्या तोंडातूनही रक्त येत होते. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता. याच्या अहवालात या मुलीवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, या वेळी बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्तेही शवविच्छेदन गृहात पोहोचले. मुलीचे डोळे फोडण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात ही बाब स्पष्ट होऊ शकली नाही. मात्र, तिच्यावर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले आहे.

या प्रकरणी बसप अध्यक्ष मायावती यांनी ट्विटरवरून योगी सरकारवर निशाणा साधताना 'उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. मुलींवर बलात्कार होत आहेत आणि त्यांची निर्दयतेने हत्या केल्या जात आहेत,' असे म्हटले आहे.

मायावती यांनी या दलित मुलीवर झालेले अत्याचार प्रकरण उचलून धरल्यानंतर याच्या तपासाला गती आली आहे. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे फारसे लक्ष घातले नव्हते. मात्र, आता पोलीस बचावात्मक पवित्र्यात दिसत आहेत. पोलीस अधीक्षक सतेंद्र कुमार सिंह यांनी या प्रकरणी चौकशी सुरू असून मुलीच्या नातेवाईकांच्या संशयावरून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींवर पोलीस एनएसएअंतर्गत कार्रवाई करत आहेत.

Last Updated : Aug 16, 2020, 1:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details