पाटणा - शहरातील पत्रकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अल्पवयीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात नागरिक संतप्त झाले असून त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. तसेच जमावाने पोलिसांवर दगडफेक देखील केली.
पाटणामध्ये अल्पवयीन मुलीवर विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, नागरिकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा - पटणा बिहार सामूहिक बलात्कार
बिहारमधील पाटणा येथे सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना आज २८ फेब्रुवारीला समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड रोष पसरला होता. त्यांनी पत्रकार नगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपींना त्वरीत शिक्षा देण्याची मागणी केली.
संबंधित पीडिता गया येथील रहिवासी असून ती काही वर्षांपासून पटणा येथे नातेवाईकांकडे राहत होती. ती सातवीत शिकत असून काल (२७ फेब्रुवारी)शिकवणी वर्गासाठी जात होती. यावेळी एका रिक्षाचालकाने इतर ३ जणांसोबत मिळून तिचे अपहरण केले. त्यानंतर रिक्षाचालकाच्या घरी रात्रभर तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना आज २८ फेब्रुवारीला समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड रोष पसरला होता. त्यांनी पत्रकार नगर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत आरोपींना त्वरित शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच पोलिसांवर दगडफेक देखील केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला शांत केले. त्यानंतर शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.