जयपूर :तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीला उचलून नेत, तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार राजस्थानमध्ये समोर आला आहे. जयपूरच्या हांडीपोरा गावामध्ये बुधवारी ही घटना घडली. या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कालू, विक्रम आणि जीतू अशी या आरोपींची नावे आहेत. आमेर पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत तिघांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेही याच गावचे रहिवासी होते. पीडिता काही कामासाठी घरातून बाहेर पडली असता, या तिघांनी तिला उचलून एका निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यानंतर हे तिघेही तेथून पळून गेले.