कोलकाता- वाढदिवसानिमित्त पार्टी आहे असे म्हणत 12 वर्षीय मुलीला बळजबरीने दारू पाजत चौघांनी बलात्कार केल्याची गुरूवारी (दि. 6 फेब्रुवारी) रोजी घडली. ही घटना दक्षिण कोलकाताच्या इकबालपूर येथे घडली. या प्रकरणी चौघांना काल (दि.7 फेब्रुवारी) अटक झाली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पणश्री येथील एका 12 वर्षीय मुलीला तिच्या एका मित्राने आपल्याला वाढदिवसाच्या पार्टीला जायचे आहे, असे सांगितले. त्यावरून ती घरी सांगून त्याच्यासोबत गेली. त्यानंतर त्याने तिला इकबालपूर येथील एका मित्राच्या घरी नेले. त्या ठिकाणी त्याचे आणखी तीन मित्र होते. त्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने दारू पाजली. दारू पाजल्यानंतर चौघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.
मुलीची दारूची नशा उतरल्यानंतर तिला त्रास होत असल्याने तीन थेट पर्णश्री पोलीस ठाणे गाठत पोलिसांना हकिकत सांगितली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत लागलीच तपास सुरू केला.