महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा अत्याचार - rape in bhiwadi

अलवर येथील खुशखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

CRIME
CRIME

By

Published : Apr 7, 2020, 10:17 AM IST

भिवाडी -अलवर येथील खुशखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या मुलीची मेडिकल चाचणी करण्यात आली असून लवकरच त्या दो तरुणांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा अत्याचार

पीडितेच्या कुटुंबीयांनी यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. भरतपूर येथे राहणाऱ्या दोन तरुणांनी त्या मुलीला गाडीवर बळजबरीन बसवून खुसखेडा भागातील एका बंद पडलेल्या कंपनी घेऊन गेले. त्यानंतर तिथे तिच्यावर दोघांंनी बलात्कार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.ही मुलगी शेतात गेली होती. दरम्यान, मुलगी घरी आली नसल्याचे पाहून कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर रात्री उशीरा खुशखेडा येथील एका बंद पडलेल्या कंपनीत ती मुलगी सापडली. या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिल्यास ठार मारण्याची धमकी त्या नराधमांनी पीडितेच्या कुटुंबीयांना दिली.

दरम्यान, आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती खुशखेडा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी विजय तिवाडी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details