नवी दिल्ली - लहान उद्योगांना मदत करून पुढे आणण्यासाठी लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून www.Champions.gov.in या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे. क्रिएशन अॅन्ड हार्मोनियस अॅप्लिकेशन ऑफ मॉडर्न प्रोसेसेस म्हणजेच CHAMPIONS असे नाव पोर्टलला देण्यात आले आहे. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या लहान उद्योगांना मदत करण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा -'पंतप्रधानांनी 'हेडलाईन' दिली, मात्र, हेल्पलाईन दिली नाही'
चॅम्पियन्स पोर्टल सुरु करण्यामागची तीन महत्त्वाची उद्दिष्यै
- कोरोना संकटाच्या काळात लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत, कच्चा माल, कामगार आणि विविध शासकीय परवानग्या मिळवून देण्यासाठी या पोर्टलची निर्मिती करण्यात आली आहे.
- कोरोना संकटाच्या काळात देशात आरोग्य सुरक्षेसंबधी विविध उपकरणे बनविण्यात येत आहेत. कोरोनामुळे उद्योगांना या नव्या संधी कशा पदरात पाडून घेता येतील यासाठी पोर्टलद्वारे मदत करण्यात येणार आहे. मास्क, सुरक्षा उपकणे, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कपडे यांसारखी उत्पादने लहान उद्योगांनाही बनविता यावी.
- चांगली कामगिरी करणारे लघू- सुक्ष्म आणि मध्यम उद्योग कोणते आहेत, हे समजण्यास यामुळे मदत होणार आहे. असा उद्योगांना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे आणता येईल याबाबत दिशा मिळेल.
यासाठी दिल्लीतील MSME मंत्रालयाच्या सचिव कार्यालयात हब उभारण्यात आले असून ६६ राज्यस्तरीय कंट्रोल रुमही सुरु करण्यात येणार आहेत. लहान उद्योगांना पाहिजे ती मदत या सुविधेद्वारे करण्यात येणार आहे. कोरोनामुळे उद्योग अडचणीत सापडले आहेत, त्यांचे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. उद्योगांना मंदीतून बाहेर काढण्यासाठी मंत्रालयाचा हा उपक्रम आहे.
हेही वाचा -अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची ४ वाजता पत्रकार परिषद; आर्थिक पॅकेजच्या तरतुदी सागंणार?