नवी दिल्ली - सध्या भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारताने चीनच्या 59 अॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर 29 आणि 30 ऑगस्टच्या रात्री पँगाँग लेकच्या दक्षिणेस चिनी सैन्याच्या घुसखोरीच्या प्रयत्नानंतर भारताने कठोर पाऊल उचलत पुन्हा एकदा चीनच्या 118 अॅप बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, या अॅपमध्ये पबजी या गेमचाही समावेश आहे.
बंदी घातलेल्या या अॅपमध्ये पबजी लाईट, वूई चॅट वर्क, कॅमेरा सेल्फी संर्दभातील विविध अॅप, म्युझिक प्लेअर एमपी 3, वेब ब्राऊझर, फोटो गॅलरी आणि अॅप लॉक यासारख्या अॅपचा समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे.