नवी दिल्ली - सध्या देशात लॉकडाऊन सुरू आहे. १४ एप्रिलला संपणारा लॉकडाऊन पंतप्रधान मोदी यांनी ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय काल (मंगळवारी) जाहीर केला. यावेळी देशाला संबोधित करताना पंतप्रधानांनी नागरिकांना सप्तपदीचे पालन करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या सप्तपदीबाबत आयुष मंत्रालयाने माहितीपत्रक आणि नियमावली जारी केली आहे. गरम पाणी पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते यासारख्या अनेक बाबी आयुष मंत्रालयाने सांगितल्या आहेत.
आयुष मंत्रालयाने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवर एक व्हिडिओ टि्वट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधानांनी सांगितलेल्या सप्तपदीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.