महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

"एक देश, एक निवडणूक या चर्चेनंतर आता एक देश, एक रेशनकार्ड"

एक देश, एक निवडणूक या चर्चेनंतर आता एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर मोदी सरकारने काम सुरू केले आहे

By

Published : Jun 28, 2019, 11:06 AM IST

Updated : Jun 28, 2019, 11:13 AM IST

रामविलास पासवान

नवी दिल्ली- नुकतेच देशभरात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. एक देश, एक निवडणूक या चर्चेनंतर आता एक देश, एक रेशनकार्ड योजनेवर मोदी सरकारने काम सुरू केले आहे. यासंबंधीत माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली आहे.


केंद्रीय अन्न नागरी पुरवठा रामविलास पासवान यांनी गुरवारी सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी एक देश, एक रेशनकार्ड या योजनेविषयी माहिती दिली आहे. या बैठकीत सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्यातील अधिकारी उपस्थित होते.


एक देश एक रेशनकार्ड योजना लागू झाल्यास बोगस रेशनकार्ड्सना आळा बसणार आहे. आधार कार्डप्रमाणेच रेशनकार्डलादेखील एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. त्यामुळे रेशनकार्डचा वापर देशभरात कुठेही करता येऊ शकणार आहे. याचा मोठा फायदा देशभरात सतत प्रवास करत असलेल्या लोकांना होईल, असे पासवान यांनी सांगितले आहे.


रेशनकार्ड्सच्या डिजिटलायझेशनवर काम करण्याची सूचना खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाचे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बैठकीला उपस्थित सर्व राज्यांच्या अधिकाऱ्यांना दिली आहे.

Last Updated : Jun 28, 2019, 11:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details