सहारनपूर- हैदराबाद येथील पशुवैद्यकीय डॉ. तरूणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे. मोदी सरकार अशा घटनांबाबत अतिशय गंभीर असून अशा गुन्ह्यांतील आरोपींविरोधात कडक कायदा तयार करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. दिव्यांगांना कृत्रिम अवयव व सायकल वाटपाच्या कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
डॉ. तरुणीवर सामूहिक बलात्कार व निर्घृण हत्या मानवतेला काळिमा- रामदास आठवले - hyderabad gang rape case
पशुवैद्यकीय डॉ. तरूणीवर बलात्कार करून हत्या केल्या प्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले की, मोदी सरकार अशा घटनांबाबत अतिशय गंभीर असून अशा गुन्ह्यांतील आरोपींविरोधात कडक कायदा तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
रामदास आठवले
सहारनपूर येथे जागतिक अपंग दिनानिमित्त कृत्रिम अवयव आणि सायकल वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मायावतींवर टीका करताना रामदास आठवले यांनी बहूजन समाज पक्षावर त्यांनी कब्जा केल्याचा आरोप केला. विविध राजकीय विषयांबरोबरच त्यांनी 'हम दो हमारा एक' या कायद्यावरही भाष्य केले.
Last Updated : Dec 2, 2019, 4:53 PM IST