नवी दिल्ली - दहशतवादाशी लढा देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी मोठे पाऊल उचलले आहे. आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी जमवणाऱ्यांवर विशेष नजर ठेवली जाणार आहे. गृह मंत्रालयाने यासाठी 'टेरर मॉनिटरिंग ग्रुप' (टीएमजी) तयार केला आहे. हे पथक एडीआयजी, सीआईडी, जम्मू-काश्मीर पोलिसांच्या नेतृत्वाखाली संचलित केले जाणार आहे.
दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची मोठी योजना - terror monitoring group
याआधीही राज्यात दहशतवाद आणि दहशतवादी यांचे कंबडरे मोडण्यासाठी केंद्राने वारंवार पावले उचलली आहेत. या पथकात आयबी, एनआयए, सीबीआय, सीबीसी, सीबीडीटी आणि ईडी यांनाही सहभागी करण्यात आले आहे.
अमित शाह
केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मू-काश्मीर प्रकरणी काम करणाऱ्या डेस्कच्या निर्देशांनंतर हे पाऊल उचलले आहे. याआधीही राज्यात दहशतवाद आणि दहशतवादी यांचे कंबडरे मोडण्यासाठी केंद्राने वारंवार पावले उचलली आहेत. या पथकात आयबी, एनआयए, सीबीआय, सीबीसी, सीबीडीटी आणि ईडी यांनाही सहभागी करण्यात आले आहे.
असे चालेल या पथकाचे काम
- टीएमजीची दर आठवड्याला बैठक होईल.
- बैठकीत विविध प्रकरणी होणाऱया कारवाईचे परीक्षण होईल.
- राष्ट्रद्रोही तत्वांवर कारवाईचा अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सोपवण्यात येईल.
- या पथकाकडे दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांवर नजर ठेवण्याचे काम आहे.
- दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करण्याचीही त्यांच्याकडे जबाबदारी आहे.
- दहशतवादाशी संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल.