अंबाला -भारत बायोटेक या हैदराबादची फार्मा कंपनीकडूनकोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या रोहतक, हैदराबाद आणि गोवा येथे सुरू झाल्या आहेत. हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज यांनी या लसचाचणीत स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. रोहतक येथील रुग्णालयात त्यांनी स्वतः लस टोचून घेतली. यासंदर्भात त्यांनी टि्वट करून माहिती दिली.
आज देशभरातील 20 रिसर्च सेंटरमध्ये 25 हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस दिला जात आहे. 20 सेंटरपैकी एक सेंटर रोहतकमध्ये आहे. पहिल्या टप्प्यात 375 तर, दुसऱ्या टप्प्यात 380 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये 25 हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकांना लसीचा डोस देण्यात येणार आहे.