नवी दिल्ली - सध्या भारत-चीनदरम्यान तणाव असून सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. येत्या 26 ऑक्टोबरपासून भारतीय लष्काराचे चार दिवसीय संमेलन सुरू होत असून यामध्ये सैन्यातील प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्षपदी लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे असणार आहेत. चीन-भारत तणाव, जम्मू-काश्मीर ऑपरेशन, लष्करातील काही सुधारणा, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी असलेल्या सुरक्षारक्षकांच्या संख्येत कपात करणे अशा अनेक प्रस्तावांवर या संमेलनामध्ये चर्चा होणार आहे.
26 ऑक्टोबरपासून लष्करातील प्रमुख अधिकाऱ्यांचे संमेलन, विविध प्रस्तावांवर होणार चर्चा
येत्या 26 ऑक्टोबरपासून भारतीय लष्काराचे चार दिवसीय संमेलन सुरू होत असून यामध्ये सैन्यातील प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहेत. या संमेलनाचे अध्यक्षपदी लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे असतील.
लडाखमधील चीनसोबतचा वाद सोडवण्यासाठी पुढच्या आठवड्यात चीन-भारतादरम्यान चर्चा होणार आहे. चर्चेचीही आठवी फेरी असणार असून 12 ऑक्टोबरला सातवी फेरी पार पडली होती. गेल्या मे महिन्यापासून दोन्ही देशांदरम्या तणाव असून चीनच्या आडमुठेपणामुळे चर्चेतून मार्ग निघत नाहीये.
भारत आणि चीनदरम्यान गेल्या मे महिन्यापासून तणाव होता. मात्र, गलवान खोऱ्यातील रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमावादाचा प्रश्न आणखी चिघळला. समस्येवर चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लष्कराच्या बैठका सुरू असून दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी यात सहभागी होतात.