नवी दिल्ली -देशभरात पहिल्यांदाच लष्कराची बँन्ड पथके स्वांतत्र्य दिनाच्या पंधरा दिवस आधीपासून विविध ठिकाणी कार्यक्रम सादर करत आहेत. लष्कर, नौदल आणि पोलिसांच्या बँन्ड पथकाने पोरबंदर, हैदराबाद, बंगळुरु, रायपुर, अमृतसर, गुवाहटी, अलाहाबाद आणि कोलकाता शहरात आपले कार्यक्रम सादर केले आहेत, अशी माहिती लष्कराने आज दिली.
कोरोना योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच सर्व वॉरियर्सचे कौतुक करण्यासाठी लष्कराच्या बँन्ड पथकाकडून कार्यक्रम सादर करण्यात येत आहेत. स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना वॉरिअर्स महामारी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पहिल्यांदाच स्वातंत्र्य दिनाच्या 15 दिवस आधी जल्लोषात कार्यक्रम सुरु झाल्याचे लष्कराने सांगितले.