श्रीनगर- जम्मू-काश्मीरच्या महाराज गंज झैना कादल येथील पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्लामध्ये झैना कादल भागात राहणारी गुलाम नबी हंगेर नावाची व्यक्ती जखमी झाली होती. त्यांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यासोबतच, महम्मद रफीक शाल्ला हा नागरिकही या हल्ल्यात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.