श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये लष्कराने दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यावेळी अतिरेकी आणि लष्करामध्ये चकमक झाली. यानंतर दहशतवाद्यांनी बंदुका आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जागेवरच टाकून त्या ठिकाणाहून पोबारा केला.
शुक्रवारी रात्री पोलीस आणि लष्कराने मिळून हे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. कुलगाममध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कुपवाडाच्या नंदीमार्ग भागामध्ये पोलीस आणि लष्कर मिळून अतिरेक्यांचा शोध घेत होते. यावेळी एका ठिकाणी पोहोचल्यानंतर, एका घरामधून लष्करावर गोळीबार करण्यात आला. तेव्हा हे अतिरेकी याच घरात आहेत, अशी जवानांची खात्री पटली.