महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, सर्व जवान सुरक्षित - काश्मीर दहशतवादी अटक

रविवारी रात्री हा हल्ला झाला. बुलेटप्रूफ अशा लष्करी वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर ते तिथून पळून गेले. दरम्यान, वाहनामधील सर्व जवान सुरक्षित आहेत.

Militants ambush Army patrol in Kulgam, no casualty
लष्करी वाहनावर दहशतवादी हल्ला, सर्व जवान सुरक्षित

By

Published : Dec 23, 2019, 10:36 AM IST

श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यामध्ये, गस्तीवर असणाऱ्या लष्करी वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी रात्री हा हल्ला झाला. बुलेटप्रूफ अशा लष्करी वाहनावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, वाहनामधील सर्व जवान सुरक्षित आहेत.

दुसऱ्या एका घटनेमध्ये, किश्तवरमध्ये झालेल्या एका गोळीबारात दोन पोलीस जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, बारामुल्ला जिल्ह्यातील सापोर पोलिसांनी एका दहशतवाद्याला अटक केली. हा दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. अद्याप या दहशतवाद्याची ओळख पटली नसून, पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा : CAAवरून 'या' नेत्याने दिली थेट अमित शाहांना धमकी..

ABOUT THE AUTHOR

...view details