9.15 AM : जम्मूच्या नागरोता भागात सुरू असलेल्या चकमकीमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. यासोबत आणखी चार दहशतवादी आसपासच्या परिसरात लपून बसले असल्याची शक्यता पोलीस महानिरीक्षक मुकेश सिंह यांनी व्यक्त केली.
श्रीनगर - जम्मूमध्ये दहशतवाद्यांनी पोलिसांवर केलेल्या गोळीबारानंतर झालेल्या चकमकीत, तीन दहशतवादी ठार झाले आहेत. तर, एक पोलीस अधिकारी यात जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
जम्मूच्या बाहेरील भागात असणाऱ्या नागरोता येथील टोल प्लाझावर तैनात असणाऱ्या पोलिसांवर तीन ते चार दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. याला प्रत्युत्तर देत पोलिसांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. हे एका नव्या दहशतवादी संघटनेचे सदस्य आहेत, ते श्रीनगरकडे चालले होते. हीरानगर सीमेवरील कठुआमधून हे दहशतवादी भारतात आल्याची शक्यता आहे, अशी माहिती जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाघ सिंह यांनी दिली.
हेही वाचा : शांघाय सहकार्य संघटनेत सदस्यत्वाची भारताने मोजलेली किंमत..