श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील गुस्सो भागात मंगळवारी सकाळी सुरक्षा दलाने केलेल्या एनकाउंन्टरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान हुतात्मा झाला असून एक पोलीस जखमी झाला आहे.
"शरण ये..."; दहशतवादी मुलाला वाचवण्यासाठी बापाची आर्जवं...
काश्मीरमध्ये शनिवारी (४ जुलै) झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यामधील एक दहशतवादी काश्मीरचा तरुण होता. चकमकीपूर्वी त्याचे वडील त्याला शरण येण्यासाठी विनवणी करत होते. मात्र, त्यांचे म्हणणे ऐकण्यास त्याने नकार दिला, ज्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागले. हिलाल अहमद असे या तरुणाचे नाव होते. तो काही दिवसांपूर्वीच हिजबुलमध्ये सहभागी झाला होता.
JK : चकमकीत दहशतवादी ठार, एका जवानाला वीरमरण
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिह्यातील मालबाग परिसरात शुक्रवार (३ जुलै) सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. गुरूवारी रात्री उशिरा पर्यंत झालेल्या या चकमकीत जवानांनी एका दहशतवाद्याच्या खात्मा केला. एका जवानाला या चकमकीत वीरमरण आले.
जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला; तीन वर्षांच्या मुलाला वाचविण्यात पोलिसांना यश
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये तीन वर्षांच्या मुलाला वाचवण्यात जम्मू आणि काश्मिर पोलिसांना यश आले आहे. आज (बुधवारी, १जुलै)) बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर शहरामध्ये दहशतवाद्यांनी अंधाधुंद फायरिंग केली. यामध्ये एक सीआरपीएफ जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला तर दोन जवान जखमी झाले आहेत. फायरिंग सुरू असताना लहान मुलगा जवळील घरामध्ये अडकला होता. त्याची सुटका करण्यात पोलिसांना यश आले.