डेहराडून- उत्तराखंड राज्याला आज (सोमवार) ३.९ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबाबतची माहिती दिली. सकाळी ९.४० च्या दरम्यान, हरिद्वार आणि शेजारच्या परिसरासह देहराडून, रुरकी आणि लकसर येथे भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे काही काळ नागरिकांत भीती पसरली होती.
उत्तराखंड राज्याला भूकंपाचा सौम्य धक्का - हरिद्वार भूकंप
उत्तराखंड राज्याला आज ३.९ रिश्टर स्केल क्षमतेचा भूकंपाचा धक्का बसला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबाबतची माहिती दिली.
प्रतिकात्मक छायाचित्र
भूकंपाचे केंद्र हरिद्वार जवळ
जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाल्याची माहिती मिळाली नाही. या भूकंपाचे केंद्र हरिद्वारजवळ होते. जमिनीखाली १० किमी अंतरावर भूकंपाची नाभी होती. उत्तराखंड राज्य हिमालयीन रांगामध्ये येत असल्याने या भागात भूकंपाचे धक्के कायमच जाणवतात. भूगर्भशास्त्र विभागाचे कार्यालय तेथील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असते.