वायनाड- थंड हवामानाच्या शोधात केरळमधील पश्चिम घाटामध्ये येणारी फुलपाखरे वायनाडमधून परतू लागली आहेत. साधारणपणे फुलपाखरे पावसाळ्याच्या सुरुवातीला परतात.
वायनाडमधून प्रवासी फुलपाखरांचा परतीचा प्रवास सुरू
साधारणपणे पावसाळ्याच्या सुरुवातीला वायनाडमधून परत फिरणाऱ्या फुलपाखरांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. फेर्न्स नॅच्युरिलिस्ट सोसायटीने याबाबत अभ्यास करून निरीक्षण मांडले आहे.
फुलपाखरांच्या विविध 46 प्रजातीची फुलपाखरे केरळमधील थंड हवामानाच्या शोधात वायनाडमध्ये येतात. ब्ल्यू टायगर आणि कॉमन इंडियन क्रो फुलपाखरु (नीलक्कादुवाआणि अरली शलाभम मल्याळम भाषेत) यासह विविध प्रजातीची फुलपाखरे केरळात येतात.
पश्चिम घाटात थंड हवेच्या शोधात येणारी फुलपाखरे ही दक्षिण भारतातील मैदानी प्रदेश आणि पूर्व घाटातून येतात. फुलपाखरे शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन पश्चिम घाटात पोहोचतात. मात्र, फुलपाखरांचा पश्चिम घाटातून परतीचा प्रवास नेहमीपेक्षा लवकर सुरु झाला आहे.