महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कोविड - 19 च्या फैलावामुळे 13 लाख 74 हजारहून अधिक भारतीय कामगार मायदेशी - Overseas Indian Workers News

कोविड - 19 च्या साथी रोगाच्या काळात विविध परदेशांमधून भारतात परत आलेल्या भारतीय कामगारांविषयीच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने आकडेवारी दिली. यानुसार, आतापर्यंत भारतात परतलेल्या एकूण कामगारांची संख्या 3 लाख 8 हजार 99 आहे. तर, हवाई, जमीन आणि समुद्रमार्गे परतलेल्या एकूण भारतीयांची संख्या 13 लाख 74 हजार 237 हून अधिक आहे.

परदेशातील भारतीय कामगार मायदेशी
परदेशातील भारतीय कामगार मायदेशी

By

Published : Sep 17, 2020, 4:56 PM IST

कोविड - 19च्या साथी रोगाच्या काळात विविध परदेशांमधून भारतात परत आलेल्या भारतीय कामगारांविषयीच्या अतारांकित प्रश्न क्रमांक 611 च्या उत्तरात परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी (16 सप्टेंबर) दिलेल्या आकडेवारीनुसार -

  • कोविड - 19च्या साथीच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधामुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या परत येण्यासाठी सुविधा देण्यासाठी वंदे भारत मिशन 7 मे 2020 रोजी सुरू झाले.
  • त्यानंतर, 10 सप्टेंबर 2020 पर्यंत 13 लाख 74 हजार 237हून अधिक भारतीय हवाई, जमीन आणि समुद्रमार्गे भारतात परतले आहेत.
  • त्यापैकी 3 लाख 8 हजार 99 कामगार होते. त्यांच्यापैकी सर्वांच्या नोकर्‍या गेल्या नव्हत्या. मात्र, कोविड - 19 चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे ते भारतात परतले.
  • कोविड-19 च्या फैलावामुळे विविध देशांतील भारतीय कामगार देशात परतले. यापैकी 3 लाख 8 हजार 99 कामगार यूएईमधून, 50 हजार 536 जण ओमानमधून, 49 हजार जण सौदी अरेबियातून, 44 हजार 248 जण कुवेतमधून, 30 हजार 509 जण कतारहून परत आले आहेत.
  • यापैकी सर्वाधिक भारतीय कामगार आखाती देशांतून परत आले आहेत ही बाब सर्वांत महत्त्वाची आहे. तर, 2 हजार 390 भारतीय अमेरिकेतून परत आले आहेत. यूकेमधून 1 हजार 98, कॅनडामधून 951, फ्रान्समधून 613 भारतीय कामगार देशात परतले.

कोविड - 19 महामारीमुळे परदेशातून भारतात परतलेल्या कामगारांची संख्या

देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या
यूएई 84497 यूएसए 2390 इटली 565 जमैका 266 फिलिपाईन्स 204
ओमान 50536 नायजेरिया 2207 इंडोनेशिया 517 रशिया 262 अँग्विल्ला 193
सौदी अरेबिया 49000 बांगलादेश 1517 लेबेनॉन 503 साऊथ आफ्रिका 261 सिएरा लिओन 188
कुवेत 44248 श्रीलंका 1268 ऑस्ट्रेलिया 405 युगांडा 247 चीन 184
कतार 30509 युनायटेड किंग्डम 1098 रिपब्लिक ऑफ काँगो 372 मॉरिशस 246 टांझानिया 167
बहारिन 14920 कॅनडा 951 डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो 365 नॉर्वे 243 इराण 156
सिंगापूर 5043 फ्रान्स 613 घाना 339 सेशल्स 215 मलेशिया 149
मालदिव्ज 4584 अल्जेरिया 584 जर्मनी 328 जॉर्डन 212 इथियोपिया 139
इराक 3960 कझाखस्तान 584 कोटे डिव्हॉयरे 270 न्यूझीलंड 205 मॉरिटानिया 139
देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या
व्हिएतनाम 135 सेनेगल 84 मालावी 53 सायप्रस 24 फिनलंड 8
मोझांबिक 131 बेनिन 83 सोमालिया 52 पोर्तुगाल 24 मेक्सिको 8
जपान 125 उझबेकिस्तान 82 युक्रेन 41 ब्राझील 19 मोरोक्को 8
स्वीडन 122 मादागास्कर 79 थायलंड 39 ताजिकिस्तान 18 बल्गेरिया 6
पोलंड 119 केनिया 78 कॅमेरून 37 टोगो 18 चिली 6
सुदान 105 नेदरलँडस् 78 तुर्की 34 अर्मेनिया 12 चाड 5
कंबोडिया 99 इस्रायल 73 बेल्जियम 32 जिबूटी 11 म्यानमार 5
इजिप्त 92 बोत्सवाना 60 एरिट्रिया 29 फिजी 9 साऊथ कोरिया 5
ब्रुनेई दारुसलेम 88 माल्टा 57 किर्गिस्तान 28 जॉर्जिया 9 स्पेन 5
देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या देश कामगारांची संख्या
आयर्लंड 4 साऊथ सुदान 2 कोलंबिया 1 कोरिया रिपब्लिक ऑफ (साऊथ) 1 ट्युनिशिया 1
नेपाळ 3 बेलारुस 1 डेन्मार्क 1 त्रिनिदाद आणि टोबॅगो 1 एकूण 308099

अफगाणिस्तान, अर्जेंटिना, बार्बाडोस, बुरुंडी, चेक रिपब्लिक, ग्वाटेमाला, गिनी, हंगेरी, पापुआ न्यू गिनी, रवांडा, सुरीनाम, स्वित्झर्लंड, व्हेनेझ्युएला, झांबिया या देशांमधून एकही भारतीय कामगार देशात आतापर्यंत परतलेला नाही. आतापर्यंत भारतात परतलेल्या एकूण कामगारांची संख्या 3 लाख 8 हजार 99 आहे. तर, हवाई, जमीन आणि समुद्रमार्गे परतलेल्या एकूण भारतीयांची संख्या 13 लाख 74 हजार 237 हून अधिक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details