महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

महाराष्ट्र-मध्य प्रदेश सीमेवर स्थलांतरितांकडून पोलिसांवर दगडफेक - Madhya Pradesh

महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात येणाऱ्या शेकडो कामगारांचा जमाव सेंधवा येथे हिंसक बनल्याचे वृत्त माध्यमांनी दिले होते. प्रशासन या सर्वांना अन्न आणि पुढील प्रवासासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याने हा गोंधळ उडाल्याचे वृत्त होते. मात्र, जिल्हाधिकारी अमित तोमर यांनी या सर्व वृत्तांना फेटाळून लावले असून केवळ गैरसमजातून हा हिंसक प्रकार घडल्याचे म्हटले आहे.

दगडफेक
दगडफेक

By

Published : May 15, 2020, 1:19 PM IST

इंदूर (मध्यप्रदेश) -महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या स्थलांतरित मजूर आणि कामगारांच्या जमावाने काल हिंसक रूप धारण केले. राष्ट्रीय महामार्ग 3 वरती गुरुवारी या स्थलांतरितांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यांच्या अन्नपाण्याची आणि इतर आवश्यक बाबींची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, नऊ तास अन्नपाण्याशिवाय राहिल्यानंतर या सर्वांचा संयम सुटला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे.

मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील सेंधवा येथे जमावाने हिंसक रूप धारण केले या प्रसंगाचे मोबाईलवरील व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये शेकडो लोक आरडाओरडा करत महामार्गावर धावत असल्याचे दिसत आहे.

'प्रवास करणाऱ्या स्थलांतरितांसोबत अगदी एका महिन्याच्या लहान बाळापासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वजण प्रवास करत आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला येथे पाठवले. मात्र, आमचे स्वतःचे सरकार आम्हाला अडवत आहे. गुरुवारी रात्रीपासून आम्ही भुकेले आहोत आणि आम्हाला पाणीसुद्धा मिळालेले नाही,' असे पुण्यात काम करणाऱ्या सुनीत मिश्रा यांनी सांगितले. त्यांना सतना येथे जायचे आहे. 'येथे अडवण्यात आल्यामुळे हे सर्व स्थलांतरित हतबल झाले आहेत. ते जंगलामध्ये कोणत्याही सुरक्षेशिवाय अडकून पडले आहेत. आमच्याविषयी कोणालाही कसलीही काळजी नाही,' असे त्यांनी पुढे सांगितले.

'काही स्थलांतरितांना घेऊन येथून बसेस निघाल्या. येथे राहिलेल्या काही जणांना आपल्याला बसेस मिळणार नाहीत, असे वाटल्याने त्यांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी आणखी वाहने उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर ते सर्वजण शांत झाले. येथील सीमेवरून 135 बसेसच्या माध्यमातून अनेक स्थलांतरितांना त्यांच्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहे', येथील जिल्हाधिकारी अमित तोमर म्हणाले.

'स्वतःच्या वाहनांमधून येणाऱ्या स्थलांतरितांना प्रशासन अन्न, पाणी आणि निवारा पुरवत आहे. काहीजण मध्य प्र महाराष्ट्र सीमेवरून मध्यप्रदेशात चालतही येत आहेत. त्यांनाही सुविधा पुरवण्यात येत आहेत. तसेच, येथून त्यांना वेगवेगळ्या बसेसमधून त्यांच्या जिल्ह्यात पाठवण्यात येईल,' असे तोमर म्हणाले. 'केवळ मध्य प्रदेशात येणाऱ्या स्थलांतरितांनाच या सुविधा पुरवण्यात येत आहेत असे नसून हे राज्य ओलांडून उत्तर प्रदेश आणि बिहार येथे जाऊ इच्छिणाऱ्या स्थलांतरितांनाही शक्य त्या सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत', असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी कामगारांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच, कामगारांना त्यांच्या घरी पोहोचण्यासाठी मोफत बस सेवा तसेच, वैद्यकीय तपासणी आणि जेवण मोफत दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

महाराष्ट्रातून बिहार आणि उत्तर प्रदेशात जाणाऱ्या कामगारांसाठी सेंधवा हा महत्त्वाचा थांबा आहे. येथून त्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी बसेस आणि ट्रक उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सेंधवाच्या सीमेवरील बिजासन घाट येथे या मजुरांचे सर्वाधिक जथ्थे येत असून दररोज पाच ते सहा हजार कामगार येथे येऊन येथून पुढे जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details