लखनऊ -लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राच्या राजधानीत अडकलेले मजूर-कामगार रिक्षाद्वारे बिहार, झारखंड येथे परतत आहेत. मजुर आणि त्यांचे कुटुंबियांनी गावी परतण्यासाठी रिक्षाचा पर्याय निवडला आहे.बिहारच्या मधुबनी जिल्ह्यातील एका गावातील 5 जण रिक्षाचा प्रवास करत मुंबईहून गावाकडे निघाले आहेत. गावी परतण्यासाठी इतर पर्याय उपलब्ध नसल्यामुळे आम्ही रिक्षाचा पर्याय निवडला असल्याचे कामगारांनी सांगितले.
मुंबईतून ऑटो रिक्षाद्वारे प्रवास करत मजूर बिहार, झारंखडकडे रवाना - लॉकडाऊन न्यूज
सरकाकडून लॉकडाऊन उठवण्याबाबत हालचाल होत नसल्याची जाणीव झाल्याने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतल्याचे फुड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह धनंजय कुमार यांने सांगितले.
![मुंबईतून ऑटो रिक्षाद्वारे प्रवास करत मजूर बिहार, झारंखडकडे रवाना migrant workers return to home via auto rickshaws](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7204133-1001-7204133-1589520674936.jpg)
आम्ही दोन महिने लॉकडाऊन रद्द होण्याची वाट पाहिली. मात्र, सरकाकडून लॉकडाऊन उठवण्याबाबत हालचाल होत नसल्याची जाणीव झाल्याने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतल्याचे फुड डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह धनंजय कुमार याने सांगितले.
महाराष्ट्रातून काही कामगार रिक्षाद्वारे झारंखडकडे परत निघाले आहेत ते छत्तीसगड जिल्ह्यातील राजनंदगाव पर्यंत पोहोचले आहेत. गेले काही दिवस काम मिळत नव्हते यामुळे पैशाशिवाय राहणे अशक्य होते. काम मिळत नसल्यामुळे रांची येथे कुटुंबासह परत जाण्याचा निर्णय घेतल्याचे रिक्षाचालकाने सांगितले. रात्रीचे फुटपाथवर झोपतो आणि दिवसा प्रवास करतो यावेळी काही नागरिक अन्न देत असल्याचेही त्याने सांगितले.