महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विमान प्रवासाने मजूर झारखंडमध्ये दाखल, मजुरांनी 'लॉ कॉलेज'च्या माजी विद्यार्थ्यांचे मानले आभार - flight carrying migrants mumbai to ranchi

स्थलांतरीत कामगारांना मुंबईवरून विमानाने घरी पाठवण्यात आले होते. आज सकाळी ते रांची येथील बिरसा मुण्डा विमानतळावर दाखल झाले आहेत.

स्थलांतरीत कामगार
स्थलांतरीत कामगार

By

Published : May 28, 2020, 11:42 AM IST

रांची - कोरोनोवर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या स्थलांतरीत कामगारांचे हाल होत आहे. या काळात काही स्थलांतरीत कामगारांना मुंबईतून विमानाने घरी पाठवण्यात आले होते. आज सकाळी ते रांची येथील बिरसा मुण्डा विमानतळावर दाखल झाले आहेत.

विमान प्रवासाने मजूर झारखंडमध्ये दाखल

बंगळुरु येथील नॅशनल लॉ स्कुलच्या माजी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारच्या मदतीने 174 प्रवाशांना मुंबईहून रांची येथे विमानाने पाठवले होते. मजुरांना घेऊन निघालेले विमान बिरसा मुण्डा विमानतळावर दाखल झाले आहे. विमानाने प्रवास करून घरी परतल्याचा आनंद मजुरांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. मजुरांना मुंबई-दिल्ली रांची अशा मार्गाने गुरुवारी पहाटे 2 च्या दरम्यान विमान पाठविण्यात आले होते.

मुंबईहून रांचीमध्ये पोहोचल्यानंतर मजुरांना त्यांच्या घरी सोडण्यासाठी झारखंड सरकारकडून बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रांचीसह राज्यातील विविध जिल्ह्यातील प्रवासी मजूर विमानतळ आणण्यात आले आहे. मजुरांनी रांची विमानतळावर पोहोचल्यानंतर लॉ कॉलेजचे माजी विद्यार्थी व राज्य सरकारचे आभार मानले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details