शहाजहांपूर - दिल्लीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या एका बिहारहून आलेल्या स्थलांतरित मजुराचा मृत्यू झाला आहे. हा मजूर लॉकडाऊन लागू झाल्यानंतर दिल्लीहून सायकलने बिहारला जाण्यास निघाला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याची ओळख पटवण्यात आली असून धर्मवीर (वय ३२) असे त्याचे नाव आहे.
दिल्लीहून सायकलवरून बिहारला निघालेल्या रोजंदारी कामगाराचा मृत्यू - lockdown
मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राजीव गुप्ता यांनी धर्मवीरचा स्वाब कोविड-१९ च्या तपासणीसाठी घेतला असल्याचे सांगितले. त्याच्यासोबतच्या इतर कामगारांना 'आयसोलेशन'मध्ये ठेवण्यात आले असून त्यांचेही स्वाब नमुने तपासणीसाठी पाठवल्याचे ते म्हणाले.

'लॉकडाऊननंतर धर्मवीरने आणखी काही मजुरांसह दिल्लीहून बिहार मधील खजारिया जिल्ह्यात जाण्यासाठी 28 एप्रिलला सायकलवरून प्रवास सुरू केला. शुक्रवारी रात्री यासर्व मजुरांनी दिल्ली-लखनऊ महामार्गावर शहाजहांपूर (उत्तर प्रदेश) येथे मुक्काम केला. येथे धर्मवीर ची प्रकृती खालावली. इतर मजुरांनी त्याला तेथील वैद्यकीय महाविद्यालयात नेले. तेथे आणण्यापूर्वी तो मृत झाला असल्याचे घोषित करण्यात आले,' अशी माहिती सर्कल अधिकारी प्रवीण कुमार यांनी दिली.