नवी दिल्ली - सध्या जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरोना विषाणूने आता भारतातही आपले जाळे झपाट्याने विस्तारले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. यामध्ये हातावर पोट असलेल्या कामगारांनी पायीच घराची वाट धरली आहे. नाशिक येथून मध्य प्रदेशमधील आपल्या घरी पायी निघालेल्या महिलने रस्त्यामध्ये बाळाला जन्म दिला आहे. महाराष्ट्र-मध्य प्रदेशच्या बिजासन सिमेवर महिलने बाळाला जन्म दिला.
हृदयद्रावक : ७० किलोमीटर पायी चालत गेल्यानंतर दिला बाळाला जन्म - migrant pregnant women birth child
70 किलोमीटर चालल्यानंतर रस्त्यामध्ये शकुंतलाने बाळाला जन्म दिला. त्यानंतर 2 ते 3 तास आराम करून पुन्हा 150 किलोमीटर अंतर चालत महाराष्ट्र बिजासन सीमेवर पोहचली आहे. त्यानंतर सीमेवरील अधिकाऱ्यांनी त्यांना घरी पोहचवण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली.
सताना येथील उचेहारमधील रहिवासी आदिवासी शकुंतला आणि तिचे पती महाराष्ट्रातील नाशिक येथे कामानिमित्त गेले होते. मात्र, लॉकडाऊन लागू झाल्याने तिथेच अडकून पडले. वाहन मिळत नसल्याने शकुंतला गर्भावस्थेमध्ये आपल्या कुटुंबासह पायीच आपल्या मूळ गावी निघाली. मात्र, 70 किलोमीटर चालल्यानंतर रस्त्यामध्ये शकुंतलाने बाळाला जन्म दिला. त्यानंतर 2 ते 3 तास आराम करून पुन्हा 150 किलोमीटर अंतर चालत महाराष्ट्र बिजासन सीमेवर पोहचली आहे. त्यानंतर सीमेवरील अधिकाऱ्यांनी त्यांना घरी पोहचवण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. बाळ आणि आई दोघेही सुखरूप असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. भारतात लाखो कामगारांचे जीवन हे रोज मिळणाऱ्या कामावर असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा दिवस कसाबसा जातो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोट भागवणार कसं? हा यक्षप्रश्न या मजूर वर्गासमोर 'आ' वासून उभा राहिला. परप्रांतीय मजूर त्यांच्या मूळ राज्यात परतायला सुरुवात करत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांची गैरसोय होत आहे. हातावर पोट असलेले हे मजूर आपल्या घराचं ओढीनं पायीच मैलोनमैल प्रवास करत आहेत.