नवी दिल्ली - कोरोना या संसर्ग आजारांमुळे लॉकडाऊन सुरू करण्यात आले आहे. याचा फटका या परप्रांतीय कामगारानांही बसला असून महिनाभरापासून कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरातील अंबाला महामार्गावर संतप्त झालेल्या कामगारांनी गोंधळ निर्माण केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थलांतरित कामगार लवकरात लवकर त्यांच्या घरी जाऊ इच्छित आहेत.
कामागारांचा उद्रेक, अंबाला महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करून घातला गोंधळ
उत्तर प्रदेशच्या सहारनपुरातील अंबाला महामार्गावर संतप्त झालेल्या कामगारांनी गोंधळ निर्माण केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थलांतरित कामगार लवकरात लवकर त्यांच्या घरी जाऊ इच्छित आहेत.
सहारनपुरमध्ये हजारो कामगार राधास्वामी सत्संग भवनात थांबले आहेत. बरेच मजूर हरियाणा राज्याची सीमा ओलांडून पायी किंवा दुचाकीवरून चालत येत आहेत. रोजगार मिळत नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली असून त्यांना गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे.
प्रशासन त्यांना सहारनपूरमधून त्यांना बस व गाड्यांद्वारे त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठविले जात आहे. मात्र, संपूर्ण प्रकियेसाठी वेळ लागत असल्याने रविवारी कामगारांच्या भावनांचा उद्रेक झाला. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर आले आणि त्यांनी गोंधळ सुरू केला. विभागीय आयुक्त संजय कुमार, डीआयजी उपेंद्र अग्रवाल, एसएसपी दिनेश कुमार, जिल्हाधिकारी अखिलेश सिंह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. ते कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत आहेत.