नवी दिल्ली - याआधीच्या न्यायालयीन आदेशानुसार स्थलांतरितांसाठी केलेल्या व्यवस्थेबाबत तीन आठवड्यांत माहिती देण्याचे आदेश न्यायालयाने शुक्रवारी राज्यांना दिले. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्थलांतरितांच्या हालअपेष्टा आणि समस्यांवरील प्रकरणाची सुनावणी घेतली.
याआधी न्यायालयाने राज्य सरकारांना परप्रांतीयांची काळजी घेण्याविषयी काही निर्देश दिले होते. त्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल याचिकाकर्त्यांनी आक्षेप नोंदविला. त्यानंतर न्यायालयाने राज्यांना आपापले अहवाल करण्याचे निर्देश दिले.
आज सर्वोच्च न्यायालयाने राज्यांनी स्थलांतरितांसाठी केलेल्या उपाययोजनांची संपूर्ण माहिती सादर केली नसल्याचे म्हटले. त्यांना त्यांचे अहवाल देण्यासाठी आणखी तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.