महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

गोव्यात प्रशिक्षणादरम्यान मिग- २९ विमान कोसळले, वैमानिक सुरक्षित - MiG-29K aircraft news

भारतीय हवाई दलाचे मिग २९- के विमान गोव्यात समुद्र किनाऱ्याजवळ कोसळले. ही घटना आज सकाळी १०.३० च्या दरम्यान घडली.

मिग- २९
मिग- २९

By

Published : Feb 23, 2020, 3:29 PM IST

Updated : Feb 24, 2020, 4:55 PM IST

पणजी - भारतीय हवाई दलाचे मिग २९- के विमान गोव्यात समुद्र किनाऱ्याजवळ कोसळले. ही घटना रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. पायलट विमानातून सुखरुप बाहेर पडला आहे. प्रशिक्षणादरम्यान मिग कोसळल्याच्या वृत्ताला हवाई दलाने दुजोरा दिला आहे.

एअरक्राफ्टमध्ये तांत्रिक बिघाड घडल्यामुळे सदर दूर्घटना घडली असून या दूर्घटनेची चौकशी सुरू केल्याची माहिती हवाई दलाने दिली. गोव्यातील हवाई दलाच्या हंस बेसवरून विमानाने उड्डाण घेतले होते. मात्र, वैमानिक वेळीच बाहेर पडल्यामुळे त्याला सुखरूप वाचविण्यात आले. काही महिन्यांपूर्वी वेर्णा येथील औद्योगिक वसाहत परिसरात एअरक्राफ्ट कोसळण्याची दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये दोन्ही वैमानिक वेळीच बाहेर पडल्यामुळे जीवितहानी टळली होती.

Last Updated : Feb 24, 2020, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details