भोपाळ- मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे एअर फोर्सचे लढाऊ विमान मिग- २१ कोसळले. या अपघातातून विमानातील दोघेही वैमानिक बचावले आहेत. अपघातग्रस्त झालेले मिग- २१ लढाऊ विमान प्रशिक्षणासाठी वापरण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
मध्यप्रदेशमध्ये लढाऊ विमान मिग - २१ कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित - मिग- २१
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे एअर फोर्सचे लढाऊ विमान मिग- २१ कोसळले.
![मध्यप्रदेशमध्ये लढाऊ विमान मिग - २१ कोसळले, दोन्ही पायलट सुरक्षित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4545291-913-4545291-1569392095334.jpg)
मिग
विमान नक्की कोठे कोसळले? विमान कोसळल्यामुळे स्थानिक भागात जिवितहानी झाली का? याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही. वायू सेनेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी तपास सुरु केला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.