महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

बिल गेट्स यांनी अभिजित बॅनर्जी यांचे केले कौतूक, म्हणाले...'नोबेल विजेत्यांच्या कार्यामधून बरचं शिकायला मिळालं' - Bill Gates on Abhijeet Banerjee

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नोबेल विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांचे कौतूक केले आहे.

बिल गेट्स

By

Published : Oct 21, 2019, 11:27 PM IST

नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी नोबेल विजेते भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. नुकतचं भारतीय अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यासह ईस्टर डुफलो आणि मायकल क्रेमर या दोन अर्थशास्त्रज्ञांना संयुक्तरीत्या नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे.

बिल गेट्स यांनी अर्थशास्त्रात नोबेल प्राप्त करणाऱ्या विजेत्यांचे कौतूक केले आहे. त्यांच्या कार्यामुळे मला जगातील सर्वात गरीब लोकांच्या जीवनातील गुंतागुंतीबद्दल बरचं काही शिकायला मिळाले असल्याचं त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

बॅनर्जी हे अमेरिकेमधील एमआयटीच्या फोर्ड फाउंडेशन इंटरनॅशनलमध्ये अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहेत. अभिजित बॅनर्जी यांचा मुंबईत १९६१ मध्ये जन्म झाला. त्यांना 'जागतिक गरिबी दूर हटविण्यासाठी प्रयोगात्मक दृष्टीकोन' या विषयावर अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर झाला आहे. ५८ वर्षीय बॅनर्जी यांनी हॉवर्ड विद्यापीठातून १९८८ मध्ये पीएच. डी. मिळविली आहे. कोलकाता विद्यापीठात तसेच दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधून त्यांनी शिक्षण घेतले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details