वॉशिंग्टन डी. सी - कोरोना चाचणी अधिक विश्वासाहार्य बनविण्यासाठी आता मायक्रोसॉफ्टने संशोधन सुरू केले आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि 'अॅडाप्टिव्ह बायोटेक्नॉलॉजिकल' यांनी मिळून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रतिकारक्षमता कशी काम करते यासबंधीचा एक इम्यूनरेस (ImmuneRACE) नावाचा 'व्हर्च्यूअल स्टडी' सुरू केला आहे. कंपनीने अधिकृत पत्रक जारी करत याची माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी शरिरातील पेशी कशा काम करतात. हे मुख्यता या अभ्यासातून समजून घेण्यात येणार आहे. कोरोना चाचणी आणि उपचार जलद करण्यासाठी हा अभ्यास फायदेशीर ठरणार आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या अभ्यासामध्ये १ हजार कोरोनाग्रस्त सहभागी होणार आहेत. रक्तातील रोगप्रतिबंधीत पेशी, टी सेल यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. शरिरातील टी सेल सर्वात आधी आजार ओळखून त्याविरोधात लढाई सुरू करते, अशी माहिती कंपनीने दिली.