मुंबई - केंद्र सरकारने अनलॉक-2 जाहीर केला आहे. या अनलॉक-2 साठीच्या मार्गदर्शक सूचनाही सोमवारी रात्री जारी करण्यात आल्या आहेत. या सूचना 31 जुलैपर्यंत लागू असतील.
केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, 31 जुलैपर्यंत शाळा आणि महाविद्यालये, कोचिंग क्लासेस बंद राहतील. याशिवाय आंतरराष्ट्रीय उड्डाणे, मेट्रो सर्व्हिस, सिनेमा गृहे, स्विमिंग पूल, थिएटर्स, बार, तसेच सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांवरही 31 जुलैपर्यंत निर्बंध असणार आहे. तसेच अपवादात्मक स्थिती वगळता रात्री 10 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम राहील.
तसेच गृह मंत्रालयाने परवानगी दिलेल्या प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानाने प्रवास करण्याची परवानगी असेल. याशिवाय स्थानिक प्रशासनाला कलम 144 लागू करण्यासारखे आदेश जारी करता येतील.
कंटेन्मेंट झोन वगळता काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार -
शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस 31 जुलैपर्यंत बंद राहतील.