महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी.. - MHA permits conduct of University examinations

MHA permits conduct of examinations by universities and institutions during Unlock period
अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाची परवानगी..

By

Published : Jul 6, 2020, 9:08 PM IST

Updated : Jul 6, 2020, 9:37 PM IST

21:23 July 06

नवी दिल्ली : कोरोना आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यात विद्यापीठ आणि त्याअंतर्गत असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता, परंतु त्यावर आज केंद्रीय गृह मंत्रालयाने तोडगा काढला आहे.

देशातील विद्यापीठ आणि खाजगी संस्थांना आपल्या सर्व अंतिम परीक्षा घेण्यासाठीची परवानगी देण्यासाठी आज गृहमंत्रालयाने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या सचिवांना एक पत्र लिहून ही माहिती दिली आहे. या परीक्षा सोबतच देशभरामध्ये उच्च शिक्षणाचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासंदर्भात सुद्धा केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या सचिवांना सूचना देण्यात आल्या आहेत.

21:04 July 06

अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी..

केंद्रीय गृह विभागाने दिलेल्या पत्रामुळे देशभरातील विद्यापीठांच्या आणि खाजगी शिक्षण संस्थांच्या अंतिम परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून लवकरच मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृह विभागाने देशातील विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांच्या परीक्षा घेण्यासाठीची परवानगी दिली आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने कडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. या परीक्षा घेण्यासाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये कोरोणाची असलेली पार्श्वभूमी लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालय आपल्या स्वतंत्र मार्गदर्शक सूचना ही जारी करून संबंधित राज्यांना कळविणार असल्याचे आज केंद्रीय गृह विभागाकडून सांगण्यात आले.

कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगाल या सात राज्यांनी आपल्या राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय स्तरावरील अंतिम परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर अनेक खाजगी विद्यापीठाने आक्षेप घेत आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा घेऊन त्यांना निकाल देऊ शकतो, अशी तयारी दर्शवली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी यासंदर्भात यूजीसीने आपल्या जुन्या मार्गदर्शक सूचनांचा फेरविचार करावा असे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय गृह विभागाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाला पत्र लिहून देशभरातील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याची परवानगी दिली आहे.

Last Updated : Jul 6, 2020, 9:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details