नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील टाळेबंदी ३० जूनपर्यंत वाढविली आहे. देशभरात रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे.
जाणून घ्या, टाळेबंदी ५.०; ३० जूनपर्यंत हे असणार नवे नियम - News rules for lockdown 5
८ जूनपासून काही अटींसह हॉटेल व इतर उद्योग सुरू करण्यात येणार आहेत.
प्रतिकात्मक
टाळेबंदीची मुदत ३१ मे रोजी संपणार असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने टाळेबंदी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
- कंटेन्टमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत.
- ८ जूननंतर शॉपिंग मॉल, हॉटेल, धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी काही अटींवर परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी मार्गदर्शक सूचना काढण्यात येणार आहेत.
- राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमावरील निर्बंध कायम असणार आहेत.
- चौथ्या टाळेबंदीत संचारबंदी रात्री सात ते सकाळी सात होती. त्यामध्ये बदल करून रात्री नऊ ते पहाटे वाजेपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. या काळात लोकांना फिरण्यास सक्त मनाई असणार आहे.
- आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा, मेट्रो, सिनेमा, जिम्नॅशिय, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क याबाबत परिस्थितीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- राज्यांशी चर्चा करून शिक्षण संस्था, महाविद्यालय आणि शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
- आंतरराज्यीय वाहतूक अथवा राज्यांतर्गत वाहतूक अथवा मालवाहतुकीसाठी कोणतेही निर्बंध लागू नाहीत. त्यासाठी ई-पास घ्यावा लागणार नाही.
- ६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना, गर्भवती महिला आणि १० वर्षांहून कमी वयाच्या मुलांना घरीच राहण्याचा सल्ला केंद्रीय गृहमंत्रालयाने दिला आहे. केवळ जीवनावश्यक आणि आरोग्याच्या कारणांसाठी यांनी घराबाहेर पडावे, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
Last Updated : May 30, 2020, 7:55 PM IST