नवी दिल्ली - लॉकडाऊनदरम्यानही देशातील शेतीची, पेरणीची कामे सुरळीतपणे चालू रहावीत यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले आहेत. केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. यासोबतच कृषी क्षेत्राशी निगडीत मूलभूत आस्थापने चालू राहतील याकडे लक्ष देण्याचे आदेशही मंत्रालयाने राज्यांना दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतीची कामेही ठप्प झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालायने राज्यांना याबाबत निर्देश दिले आहेत. आपापल्या राज्यांमध्ये शेती आणि पेरणीविषयक कामांसाठी लागणाऱ्या गरजेच्या सेवा सुरू राहतील याबाबत राज्य सरकारांनी खबरदारी घ्यायची आहे, असे गृहमंत्रालयाने सांगितले आहे.